नवी दिल्ली | आम्ही साधू संतांना सोबत घेऊन भव्य राम मंदिर बांधणार आहोत. विरोधकांनी यामध्ये अडथळा आणू नये, असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हंटलं आहे.
अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘भारत की मन की बात’ हे अभियान सुरु केलं आहे. तेव्हा ते भारतीयांशी संवाद साधत होते.
कोर्टात राम मंदिराच्या विषयावर युक्तीवाद सुरु आहे, तरीदेखील 1993 साली आयोध्येतील अधिग्रहन केलेली जमीन भाजप सरकारने न्यासाला देण्याचा निर्णय घेतला आणि हा एक ऐतिहासिक निर्णय आहे, असंही शहांनी सांगितलं.
दरम्यान, पाच वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणामुळे देशातील दिर्घकालीन पायाभरणी झाली. आज जगाला भारताबद्दल आदर आहे, असंही शहांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, 4-1ने मालिका टाकली खिशात
-धोनीच आला मदतीला, केदारला दिलेल्या टीप्समुळे सामन्याला कलाटणी
-उदयनराजेंनी सैन्यातील जवानाला दिली ‘एअर लिफ्ट’
–हवं तर माझा जीव घ्या पण माझ्या कोंबडीला सोडा
–“अण्णांच्या उपोषणासाठी शुभेच्छा पाठवता का? आम्ही पत्रावर मार्ग काढायचो!”
Comments are closed.