बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी कर्मचाऱ्यांची दादागिरी; वृद्धाला जबर मारहाण, पाहा व्हिडीओ

पालघर | एसटीला महाराष्ट्राची लाईफलाईन समजली जाते. जिथं कोणतंही वाहतुकीचं साधन पोहोचू शकत नाही, तेथे लालपरी मात्र नक्की असते. अनेकदा पैशामुळे कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये भांडणं होताना दिसतात. अनेकदा त्याची भांडणं हाणामारीपर्यंत पोहोचतात. असाच काहीसा प्रकार पालघरमध्ये घडला आहे.

एक वृद्ध व्यक्ती एसटीतून प्रवास करत होता. पावसामुळे आता गावातील रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे प्रवास करताना एसटीतील प्रवाशांचे हाल होत होते. त्याच एसटीमध्ये एक वृद्ध जोडपं देखील होतं. त्यांना गाडी सारखी आदळत असल्याने त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी चालकाला बस हळू चालवण्याची विनंती केली.

एसटी हळू चालवण्यास सांगितल्यानं कर्मचाऱ्याला राग आला. त्याने वृद्धाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर एसटीचा चालक आणि वाहक महिलेने वृद्धाला मारहाण केली. त्यानंतर खाली उतरल्यावर देखील दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ कॅमेरामध्ये शुट झाला आहे. त्यात चालक आणि वाहक दोन्ही कर्मचारी वृद्धाला मारहाण करताना दिसत आहे.

दरम्यान, वाहक महिला वृद्धाला लाथाबुक्यांनी मारहाण करत असल्याचं कॅमेरात कैद झालंय. चालकाचं नाव गोरखनाथ नागरगोजे आणि वाहक महिलेचं नाव शितल पवार आहे. वृद्धाच्या तक्रारीनंतर या दोन्ही कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्याला राग अनावर; भररस्त्यात भाजप नेत्याचे कपडे फाडले, पाहा व्हिडीओ

चिंताजनक! कोरोनाच्या बदलत्या रूपानं लक्षणातही होतोय बदल

कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; फायनलमध्ये धडक

“जनसामान्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला”

कोरोनानंतर नोरोव्हायरसचा धुमाकूळ; इंग्लडमध्ये अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More