बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजी कोरोना सेंटरमध्ये ऐवढी रमली की, कोरोना टेस्ट निगेटिव्ह येऊनही घरी जाण्यास दिला नकार

कोल्हापूर | देशात कोरोना संक्रमण थैमान घालत असताना अपुऱ्या सोई-सुविधांमुळं नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. कोरोना संक्रमित रुग्णांचे आणि मृत्यूचे आकडे नवनवा रेकॉर्ड कायम करत आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. एक आजी कोरोना सेंटरमध्ये ऐवढी रममाण झाली आहे की ती घरी जाण्यासही नकार देत असल्याचं समोर येत आहे.

कोल्हापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राजर्षी शाहू आश्रम शाळेतल्या कोरोना सेंटरमधील वातावरण, सोईसुविधा एवढ्या उत्तम आहेत की, आजीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असूनही ती घरी जाण्यास तयार नाही. घरी जाण्याची वेळ आल्यावर आजी म्हणे मी तर घरी जाणारच नाही.

यावेळी संभाजी ब्रिगेड कोविड सेंटरचे रुपेश पाटील यांनी सांगितलं की, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ज्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आणलं जातं त्यांना इथं आल्यावर वाटत नाही की ते रुग्ण आहेत. त्यांना खोलीतून बाहेर पडण्याची मुभा आहे. शेतात फिरू शकतात, तसंच त्यांना कोविड सेंटरजवळ असलेल्या बागेत श्रमदान करता येते, फिरता येते. त्यामुळं कुठेही आपण रुग्ण आहोत, आपल्याला काहीतरी झालंय ही भावना त्यांच्या मनात राहू नये याकडं लक्ष दिलं जातं.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आजीच्या व्हिडिओबाबत रुपेश पाटील यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, इथं आजीच नाही तर अनेकजण आहेत जे 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतरही घरी जायला तयार नाहीत. ते आणखी एक दोन दिवस हट्ट करतात. त्यांना समजावून घरी पाठवावं लागतं. माझ्या घरी रहा पण सेंटरमधून बाहेर पडा, इतर रुग्णांना उपचार द्यायचे आहेत अशी विनंती केल्यानंतर लोक जातात. बऱ्या झालेल्या रुग्णांना फेटा बांधून, हालगी वाजवून, टाळ्या वाजवून निरोप दिला जातो.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, वाचा दिलासादायक आकडेवारी

‘काँग्रेसला ‘स्वबळा’वर लढूनच जर सत्ता आणायची असेल तर….’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

चाहत्यांना सुखद धक्का! अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात

प्रीवेडिंगवाल्यांना त्रास देऊ नका, ते हनिमूनलासुद्धा इथेच आले पाहिजेत- अजित पवार

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला तब्बल ‘एवढ्या’ लाख रुपयांचा गंडा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More