बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कमरेला पदर खोचून आजीबाईंचा परफेक्ट बोलिंग नेम; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनाकाळात घरी बसूून सर्वांना कंटाळा आला आहे. सर्वांना बाहेर कुुठे तरी फिरण्याची आणि मनसोक्त बागडण्याची इच्छा होत आहे. तर तरूणांना क्रिकेट खेळण्याचा मोह होत आहे. तर काही जण या कोरोनाकाळात घरगुती खेळ खेळताना दिसत आहेत. त्यात आता एका आजीबाईंचा एक गेम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक वृद्ध आजीबाई हातात बाॅल घेऊन निशाणा साधताना दिसत आहेत. त्या बोलिंगचा खेळ खेळताना दिसत आहे. पारंपारिक वेशात या आजीबाईंनी पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. त्याचबरोबर त्यांनी तोंडावर मास्क लावलेला दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी स्निकरचे शुज देखील घातले आहेत. बोलिंग पाहताच आजीबाईंना खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी कमरेला पदर खोचून बाॅल हातात घेतला.

पहिल्याच फटक्यात आजीबाईंनी अचूक नेम लावल्यानं सर्व बोलिंग पिन्स पडल्या. त्यामुळे तेथे उपस्थित सर्वाच्या चेहऱ्यावर आनंदानं हास्य फुललं होतं. सर्वच्या सर्व बोलिंग पिन्स पडल्यानंतर आजीबाईंना देखील आश्चर्य वाटलं. आजीसोबत असलेले आजीबाईंच्या नेमबाजीवर आनंद व्यक्त करत आहे.

दरम्यान, सुदर्शन कृष्णमूर्ती या नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला 4 लाख लोकांनी लाईक केलं आहे. भल्याभल्यांना न जमणारं काम आजीबाईंनी केल्यानं नेटीझन्सनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

नितीन गडकरींनी मोदी सरकारला दिला घरचा सल्ला, म्हणाले…

तुमचं SBI बँकेमध्ये काम आहे?, तर ही बातमी नक्की वाचा; बँकेने लागू केले नवीन नियम

लाॅकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर मुली लागल्या वेश्याव्यवसायाला, धक्कादायक प्रकार आला समोर

टुलकिट प्रकरणावरून केंद्रात भाजप-काँग्रेस आमनेसामने; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

चिंता वाढली! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे 26 जणांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More