बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#सकारात्मक_बातमी | एक किडनी, HRCT स्कोअर 12; पुण्यातील आजींची कोरोनावर यशस्वी मात

नागपूर | कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना वयाची शंभरी पार केलेल्या अनेकांनी कोरोनाला हरवल्याच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. आता नागपूरमधील 56 वर्षीय मेघा अरविंद भांदककर यांनी एका किडनीच्या भरवशावर कोरोनाला मात दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी मेघा अरविंद भांदककर यांचं गंभीर आजारामुळे एक मूत्रपिंड निकामी झालं होतं. ऑपरेशननंतर त्यांना एकच मूत्रपिंड आहे. अशा स्थितीत 27 मार्च रोजी त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोना चाचणी केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला नसल्याने काही दिवस घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा सिटी स्कोर 12 पर्यंत पोहोचला होता.

1 एप्रिल रोजी छत्रपती चौक येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला. मात्र त्यांच्या प्रकृतीचा पूर्वइतिहास बघता भारी डोस देण्यास डॉक्टर कचरत होते. मात्र नंतर औषधांच्या नियमित मात्रा आणि व्यवस्थित आहाराने त्यांच्या आरोग्यात आठवडाभरातच सुधारणा झाली. यानंतर त्या घरी परतल्या. तसेच त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये असलेल्या 82 वर्षीय पुष्पाताई या आजींनीही कोरोनावर मात केली.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

थोडक्यात बातम्या- 

गुजरातमधील कोविड सेंटरला आग, 12 लोकांचा होरपळून मृत्यू!

“मला रडू येतंय आणि मला झोप येत नाहीये, आमदार असल्याची लाज वाटतीये”

चक दे पट्टे! विराट कोहली, मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सला बाद करत हरप्रीतने फिरवला सामना, पाहा व्हिडीओ

ये नया पंजाब है! पंजाबने विराटच्या बंगळुरूचा केला पराभव

मास्कसंदर्भात नव्या सूचना, प्रत्येकाला ‘या’ सूचना माहितच असायला हव्यात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More