प्रार्थना फळास आली, आजी रातोरात स्टार झाली!

हैदराबाद | आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं विजेतेपद मुंबईनं पटकावलं, तशी सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली. कुणी याला जिओची पुण्याई म्हटलं तर कुणी काय! मात्र या सगळ्या गदारोळात एका आजीचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय.

सामन्यादरम्यान प्रेक्षकातील एक आजी डोळे मिटून देवाला आर्जव करताना दिसतेय. याच आजीची प्रार्थना फळाला आली आणि मुंबई जिंकली, असा नेटिझन्सचा सूर आहे. सध्या या आजीचा फोटो सोशल मीडियात तुफान शेअर केला जातोय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या