बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस द्यायला आलं पथक, आज्जीबाईचा चढला पारा, व्हिडीओ जोरदार व्हायरल

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. मात्र लसीच्या अपुऱ्या डोसमुळे कित्येकांना आपला दुसरा डोस मिळाला नाही. त्यात लस घेतल्यावर काहींना त्रास होणं किंवा काहींचा मृत्यु झाला. याचाच धागा पकडत अनेक अफवाही सोशल माध्यमांवर पसरल्या आहेत.

सोशल मीडियावरील अफवांमुळे लसीबाबत खोटी माहिती पसरल्यामुळे ग्रामीण भागात अनेकजण लस घ्यायला घाबरत आहेत. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक आजीबाई लस घ्यायला नकार देत आहेत. त्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे मात्र लसीमुळे मृत्यु होण्याच्या भीतीने त्या लस घ्यायला भीत आहेत. त्यांना लस द्यायला पथक आलेलं आहे मात्र त्या म्हणत आहेत की मरेल पण लस घेणार नाही.

आजींना लस घेण्यासाठी काहीजण विनंती करत आहेत मात्र त्या नकार देत आहेत. सोशल मीडियावर कोरोना लसीबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. यावरून ग्रामीण भागातील लोक लस घेण्यासाठी घाबरत असल्याचं हे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र कोरोना लसीबद्दल मनात कोणतीही शंका न ठेवता लस घ्यावी. आरोग्य विभाग तसेच सरकारकडून लसीबाबत माहिती दिली जात असते.

 

थोडक्यात बातम्या- 

बाॅलिवूडवर शोककळा! ‘इंदू की जवानी’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं कोरोनानं निधन

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजेंबरोबर जायला तयार”

“ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, त्यामुळे आरक्षण गेले”

पावसाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं डाॅक्टरांना आवाहन म्हणाले….

सासरवाडीतून आपल्या दीड वर्षाच्या मुलाला आणत बापाने पोरासोबत केलं हे धक्कादायक कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More