बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गँगस्टर अरूण गवळी होणार आजोबा, योगिता-अक्षयने दिली गुड न्यूज!

मुंबई | कुख्यात गुंड अरूण गवळीचा जावई अभिनेता अक्षय कुमारने गोड बातमी दिली आहे. अक्षयने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. अक्षयने व्हिडीओ शेअर करत ‘पाहुणा घरी येणार येणार गं’, असं कॅप्शन दिलं आहे.

अरुण गवळी यांची मुलगी योगिताने अभिनेता अक्षय वाघमारेशी 8 मे 2020 रोजी लग्न केलं होतं. लॉकडाऊनच्या कळात दोघांनी लगीनगाठ बांधली होती. त्यावेळी अरूण गवळीही पॅरोलवर बाहेर आला होता. त्यावेळी लेकीच्या विवाहासाठी गवळीने मुंबई आणि पुणे पोलिसांची परवानगी घेतली होती. या परवानगीनेच हा विवाहसोहळा पार पडला. अत्यंत जवळच्या लोकांना या विवाहासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

अरुण गवळीची मुलगी योगिता ही महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी काम करते. तर ती चित्रपटक्षेत्राशी देखील निगडीत आहे. तिने स्वतः काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. तर अक्षयने मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अक्षय वाघमारे नवोदित मराठी अभिनेत्यांमधलं एक चांगलं नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामध्ये ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ ‘फत्तेशिकस्त’ अशा अनेक मराठी चित्रपटांचा समावेश आहे.

दरम्यान, अक्षय त्याच्या फिटनेसमुळेही ओळखला जातो. त्याच जिममधील व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ तो पोस्ट करत असतो. त्याने ही गोड बातमी दिल्यावर त्याच्या चाहत्यांनी कमेंटमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

थोडक्यात बातम्या-

भारताने इंग्लंडला पाणी पाजत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात मारली धडक

“असंच चालत राहिल्यास नोटेवरुन गांधीचा फोटो हटवून मोदी स्वत:चाच फोटो छापतील”

…म्हणून मी स्टंपच्या मागे मोठ्याने बडबड करतो, पंतने केला खुलासा, पाहा व्हिडीओ

‘तू काय ज्येष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोनाची लस घेतल्यावर सैफ होतोय ट्रोल!

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More