“अरं…मला बी तमाशाला बोलवा”, अजितदादांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला
पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे रोखठोक बोलण्याच्या शैलीसाठी लोकप्रिय आहेत. सभेत भाषण करताना अजित पवार जोरदार फटकेबाजी करत लोकांना खळखळून हसवतात. बारामतीत बोलताना अजित पवारांनी इथं तमाशा असतो का?,असा प्रश्न करत मला पण बोलवत जा, अशी फटकेबाजी केली आहे.
लहान असताना आजोबा म्हणायचे चल तमाशाला पण जात नव्हतो, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्यतरंग उमटले. त्यानंतर तुम्ही बघितलं आणि मी बघितलं काय, एकचं. उरूस आहे, यात्रा सुरू आहेत. त्याचा आनंद घ्या, असं अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांनी यावेळी बोलताना विकासकामांवरून चिमटे काढले आहेत. मी येणार म्हणून डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला. कामे चांगल्या दर्जाची करा. कामात जर हयगय झाली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार, अशी तंबी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिली.
दरम्यान, वेगवेगळ्या सरकारमध्ये आंदोलने होत असतात. त्या आंदोलनामध्ये जर नुकसान झाले तर केसेस पाठीमागे घेतल्या जात नाहीत. मात्र, संविधानाच्या मार्गाने ज्यांनी आंदोलने केली त्या केसेस मागे घेतल्या जातात, असं अजित पवारांनी बोलून दाखवलं आहे.
थोडक्यात बातम्या-
…अन् हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंनी धरला ठेका; व्हिडीओ तुफान व्हायरल
“आयत्या बिळात नागोबा”, प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला
“राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे बनायचंय म्हणून…”
“…तर आम्ही इथवर पोहोचलोच नसतो”; ज्येष्ठ दिग्दर्शकाची भावूक पोस्ट
देशाच्या राजकारणात खळबळ! शरद पवारांच्या पुढाकाराने मुंबईत मोठी बैठक होणार
Comments are closed.