बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डोक्यात कोयत्याने वार करत नातवानेच केला आजोबांचा खून; कारण ऐकून सुन्न व्हाल

धुळे | चुलत नातवानेच आजोबांच्या डोक्यात कोयता घालून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना धुळे जिल्ह्यातील वार गावात घडली आहे. आजोबांचा खून करून आरोपी नातू फरार झाल्याची माहिती आहे.

आत्माराम पारधी असं या मयत आजोबांचं नाव असून त्यांचा चुलत नातू ज्ञानेश्वर पारधी याने भरदिवसा जुन्या कौटुंबिक वादातून आत्माराम यांच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार करत त्यांचा खून केला.

68 वर्षीय आत्माराम हिरामण पारधी यांचा चुलत नातवानेच पूर्व वैमनस्यातून खून केला आहे. आरोपीविरोधात पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेनंतर ज्ञानेश्वर हा गावातून पसार झाला आहे.

दरम्यान, कुटुंबाच्या आणि समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात समाविष्ट करून घेतले जात नसल्याने ज्ञानेश्वरच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने हा खून केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार

“नरेंद्र मोदी हे देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष”

“पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही”

फेसबुक, मेसेंजरसह व्हॅाट्सअपची सेवा काही काळासाठी ठप्प

“मोदींना विरोध म्हणजे भारतमातेला विरोध, तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More