बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सासू-सासऱ्यांच्या घरात सूनेला राहण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली | महिलांच्या अधिकारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या तसंच सासू-सासऱ्यांच्या घरात राहणाऱ्या सुनांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सुनेला सासरी राहण्याचा हक्क असून तिला नवरा किंवा सासरची मंडळी घरातून काढू शकत नाही. सून राहत असलेलं सासरचं घर भाड्याचं असेल किंवा घरच्यांनी घेतलं असेल त्याचसोबत पतीचा कोणता अधिकार नसला तरीदेखील सुनेला अधिकार मिळेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना सासरच्या कुटुंबातील सामाईक संपत्ती तसंच राहत्या घरात देखील आपला वाटा मिळेल. त्याचप्रमाणे पतीने मिळवलेल्या संपत्तीतही पत्नीचा हक्क असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

“हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याचे धाडस दाखवावे”

नितीश कुमार यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला; चिराग पासवान यांचा आरोप

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात – अशोक चव्हाण

बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More