Narayan Rane | कोकणच्या जनतेने पुन्हा एकदा राणेंवर विश्वास दाखवला. लोकसभेची निवडणूक राणेंनी जिंकली. पण आता या लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरु झाल्याचं दिसतंय. सध्या कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
‘वक्त आने दो… हिसाब भी लेंगे’
हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी? याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो आहे. ‘वक्त आने दो…जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’, असा मजकूर या बॅनरवर आहे.
हा बॅनर लावून नारायण राणेंना (Narayan Rane) इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सामंत बंधुंवर आरोप झाले होते.
Narayan Rane | नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांआधी किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. अखेर त्यांची समजूत काढण्यात आली आणि भाजपकडून राणेंना उमेदवारी देण्यात आली. यानंतर दोन्ही भावांनी राणेंना पाठिंबा जाहीर केला होता.
नारायण राणे (Narayan Rane) यांच्या महायुतीच्या प्रचारसभेला अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. यावेळी किरण सामंत यांचा देखील सन्मान करण्यात आला.
किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिंदे गटाचे नेते आहेत. मात्र ते निवडणुकीच्या दिवशीच त्यांचा पत्ता नसल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात निकालादिवशी ट्विस्ट निर्माण झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदवार्ता! सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा, ‘इतक्या’ घरसल्या किंमती
शेतकऱ्यांनो PM Kisan चा 17 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; 95 रुपयांची बचत बनवेल लखपती!
तरुणांनो सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL विभागाअंतर्गत भरती सुरु
महिलांनो सावधान! या कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक