बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धमाकेदार ऑफर! ‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारतर्फे कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना लसीकरण मोहीमेला जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था तसेच लोकांनी पुढाकार घेतला आहे. असंच गुरुग्राममधील एका हॉटेल मालकाने कोरोना लसीकरण करून घेणाऱ्या ग्राहकांना मोफत बिअर देण्याची धमाकेदार ऑफर आणली आहे. ग्राहकांनी लसीकरण केल्याचं कागदपत्र रेस्टॉरंटमध्ये दाखवून ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

‘इंडियन ग्रील रूम’ या दिल्ली जवळच्या गुरुग्राममध्ये असलेल्या रेस्टॉरंटने कोरोना लस घेतल्याचं कार्ड दाखवल्यानंतर एक बियर मोफत देण्याचं घोषित केलं आहे. तसेच 5 एप्रिल पासून या ऑफरला सुरुवात झाली असून नागरिकांकडून या ऑफरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.

देशातील अनेक भागांमध्ये लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. तसेच इंडियन ग्रील रूम या रेस्टॉरंटची ऑफर म्हणजे मद्यपींसाठी एक प्रकारे पर्वणीच असल्याचं बोललं जात आहे. सध्या या रेस्टॉरंटमध्ये मोफत बियरचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं हॉटेल मालकाकडून सांगण्यात येत आहे, तसेच अविश्वासापोटी काही लोक कोरोना लस घेत नसल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही ऑफर काढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या

“मी गौतम गंभीरला माझा आदर्श मानतो”; ‘या’ स्टार खेळाडूनं सांगितलं गुपित

“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा”

पिंपरी-चिंचवडमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही; प्रशासनाची धक्कादायक कबुली

लस उत्सवावरून राहूल गांधींचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; केलं ‘हे’ आवाहन

“कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र कसा सांभाळणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More