बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

20 हजार विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात मोठी संधी; राज्य सरकारचा अभिनव उपक्रम

मुंबई | कोरोनामुळे आरोग्य सुविधांवर मोठा ताण आलेला दिसत आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर सारख्या आरोग्य सुविधा जरी आपण उपलब्ध करू शकलो तरी अतिरिक्त डाॅक्टर्स आणि परिचारिका कुठून आणणार, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर आता आरोग्य क्षेत्रातील हा प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.

राज्यात मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक 20 हजार युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग व डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

साथीच्या रोगांशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं, यासाठी हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, आवश्यक वैद्यकीय सुविधांची ने-आण करण्यासाठी प्रशिक्षणामध्ये वाहनचालक तसेच अॅम्ब्युलनस वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश असेल. राज्यातील 1 लाख कारागिर, कामगार आदी घटकांना प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना त्यांच्या कौशल्याबाबत प्रमाणीत केले जाणार असल्याचं, नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लसीकरणाबाबत रोहित पवारांनी मोदी सरकारला दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले…

मोदी सरकारचं मोठं पाऊल, नवं चॅनल सुरु करणार!

“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”

“कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात?”

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More