Top News देश

‘हा’ आईपीओ मंगळवारी बाजारात धडकणार; गुंतवणुकदांरांसाठी मोठी संधी

Photo- Youtube Video Screegrab

नवी दिल्ली |  पैसेेे उभारण्यासाठी केंद्र सरकार निरनिराळ्या योजना हाती घेत आहे. आता रेलटेलच्या आईपीओ मधून केंद्र सरकार 819 कोटी रुपये उभारण्याच्या तयारी करत आहे. तर दुसरीकडे गुंतवणुकदांरांसाठी देखील ही मोठी संधी मानली जात आहे.

रेलटेलचा आईपीओ येत्या 16 फेब्रुवारीला बाजारात धडकणार आहे. या वर्षातील हा 6 वा आईपीओ असेल. हा आईपीओ 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान शेेअर बाजारातील गुंतवणुकदांरांसाठी खुला केला जाईल.

आईपीओ मध्ये सरकारकडून 8,71,53,369 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. यातील 5 लाख शेअर्स कंपनीतील कामगारांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. रेलटेलच्या आयपीओची प्राइज ब्रँड (सामुहिक किंमत) कंपनीने 93-94 रुपये प्रति शेअर ठरवली आहे.

रेलटेलच्या शेअर्स विक्रीतून केंद्र सरकार 819 कोटी रुपये उभारणार असून, एकूण शेअर्समध्ये सरकारची हिस्सेदारी 27.16% असेल. तर अँकर गुंतवणुकदांरांसाठी आईपीओ 15 फेब्रुवारीपासून उपलब्ध होईल.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सरकारी मालकीची कंपनी आहे. ही कंपनी भारतात ब्राँडबँड टेलिकॉम आणि मल्टीमीडिया नेटवर्कची सुविधा देत आहे. यासोबतच सहयोगी कंपनी रेलटेल इन्फॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी देशभरात आॉप्टिकल फायबरच्या सहाय्याने रेल्वे क्षेत्रात पायाभूत सुविधा उभा करते. कंपनीचे बाजारमूल्य जास्त असल्याने गुंतवणूकदांर मोठ्या संख्येनं या आईपीओकडे आकर्षित होतील, अशी शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या –

सचिनच्या मुलाचं काय होणार?; आज होणार महत्त्वाचा फैसला

‘या’ गावात सरपंच झाला की माणूस मरतोच म्हणायचे; महिलेनं घेतला धाडसी निर्णय!

शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!

पोलिसांची धडक कारवाई, 10 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या!

गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या