बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंहांबाबत धक्कादायक माहिती उघड, अनिल देशमुख सुटणार?

मुंबई | गतकाही महिन्यांपासून राज्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Parambir Singh) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचे आरोप केेले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत असलेल्या चांदीवाल आयोगानं काही गंभीर गोष्टींचा खुलासा केला आहे.

मी ऐकलेल्या गोष्टींवरून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत, असा खुलासा परमबीर सिंह यांनी वकिलांमार्फत चांदीवाल आयोगासमोर केला आहे. परिणामी परमबीर सिंगांच्या या खुलाशानंतर राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. सध्या न्यायालयानं परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं आहे. आपल्या वकिलांच्या माध्यमातून परमबीर सिंह सध्या न्यायालयाला उत्तर देत आहेत.

परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर ईडीनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात कारवाई केली आहे. सध्या अनिल देशमुख हे तुरूंगात आहेत. अशा परिस्थितीत जर परमबीर सिंह यांच्या आरोपांना पुरावेच नाहीत तर अनिल देशमुख यांच्यावर कोणत्या आधारे कारवाई करण्यात आली, असा सवाल सध्या सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेेते विचारत आहेत.

दरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत संरक्षणाची मागणी केली होती. सध्या राज्याच्या गृहविभागाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं हे प्रकरण अजून कोणत्या दिशेनं जाणार हे स्पष्ट झालेलं नाही.

थोडक्यात बातम्या 

खासदार असदुद्दीन ओवेसींनी वाहतुकीचा नियम मोडल्याने भरावा लागला 200 रुपयांचा दंड

चला मला अटक करा!, कंगनानं पोस्ट केला वाईन पितानाचा हॉट फोटो

कृषि कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर महत्त्वाचा निर्णय

LIC च्या ‘या’ स्कीमद्वारे मुलीचं भवितव्य होईल सुरक्षित, लग्नाच्या वेळी मिळतील 22 लाख

शरद पवारांच्या भेटीनंतर काय घडलं?, साताऱ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More