बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक होणार नाही

मुंबई | संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) चांगेलच अडचणींत सापडले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर अनेक दिवसांपासून आरोप करण्यात येत आहे. तेव्हापासून ते नाॅट रिचेबल आहेत. अशातच आता नितेश राणे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाने राणेंना तात्पुरता दिलासा दिला आहे. नितेश राणेंवर पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करता येणार नाही. तशी ग्वाही राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे. त्यामुळे नितेश यांना तूर्तास अटक होणार नसून आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. अशातच आता राणेंना दोन दिवसांचा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्यामुळे नारायण राणेही अडचणींत आले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना लागण

मुंबईत लागणार लॉकडाऊन?; आयुक्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

खुल्लम खुल्ला प्यार!, औरंगाबादच्या रस्त्यावरील तरुण-तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

‘नितेश राणेंना त्यांच्याच घरात लपवलंय’; शिवसेना आमदाराचा धक्कादायक आरोप

‘या’ गोष्टीचा सनी लिओनीला आजही होतो त्रास, स्वत: केला खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More