बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अटकेपूर्वी 3 दिवस आधी…’; समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई | राज्यात एनसीबीने कारवाई केलेल्या कथिक क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात काही तक्रारी दाखल झाल्यामुळे मुंबई पोलीस अटक करतील अशी शक्यता होती. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

कुठल्याही प्रकारचा एफआरआय दाखल करण्यापूर्वी तीन दिवस आधी समीर वानखेडेंना नोटीस देण्यात यावी. तसेच समीर वानखेडे यांच्याविरूद्ध तूर्तास कोणतीही कारवाई करू नयेे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही यंत्रणेसमोर जाण्यासाठी तयार आहोत. राज्य सरकारकडून आमच्याविरोधात एक मोहिम राबवली जात आहे. सरकारने एफआरआय दाखल न करताच एसआयटी तयार केली आहे, अशी भूमिका समीर वानखेडेंनी न्यायालयामध्ये मांडली आहे.

दरम्यान, समीर वानखेडेंनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. तसेच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहीलं होतं.  तपास सुरू असला तरी माझ्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या –

“पुढील अनेक दशकांपर्यंत देशाच्या राजकारणात भाजपचं वर्चस्व राहणार”

“…मग विराट कोहलीला अटक करणार का?”

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली तर मी स्वत:… – गोपीचंद पडळकर

राज्यातील ‘लाल परी’ वाहतूक बंद; एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSCची ‘इतक्या’ जागांसाठी जम्बो पदभरती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More