बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे

नवी दिल्ली | छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने बुधवारी सर्वसामान्यांना मोठा झटका दिला होता. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत सरकावर सडकून टीका केली. यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे.

छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय मागे घेत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार नाही, 2020-21 च्या अंतिम तिमाहीमध्ये जे दर होते ते यापुढेही कायम राहतील. छोट्या योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने परत घेतला आहे, असं सीतारामन यांनी सांगितलं आहे.

छोट्या योजनांवरील व्याज दर 1.10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते, 1 एप्रिल 2021 म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का देत व्याज दरात 70 बेसिस पॉईंटची कपात केली होती.

दरम्यान, सरकारने पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील व्याजदरातही 90 बेसिस पॉईंटची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळायचं. हे व्याजदर आता कायम राहणार आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडून द्यायला हवं”

शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…

रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट!

“…तर मुंबईत दिवसाला 10 हजार कोरोना रूग्ण आढळतील”

देवेंद्र फडणवीस- जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वाॅर; कारण ठरले अनिल देशमुख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More