औरंगाबाद | तलाठी भरती प्रकरणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजातील निवड झालेल्या उमेदवारा पेक्षा कमी गुण असलेल्या इतर उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्त्या न देण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ई.डब्ल्यू.एस प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना याचिकाकर्त्यांपेक्षा कमी गुण आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तलाठी भरती करिता निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे.
यावर न्या. एस व्ही गंगापूरवाला व न्या. श्रीकांत डी कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी नियुक्तीची प्रक्रिया जलदगतीने सुरू केलेली असतानाच सदरील आदेश हा मराठा समाजावर अन्याय करणारा असून यामुळे गुणवत्ता असून देखील नियुक्ती पासून उमेदवार वंचित राहत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.
थोडक्यात बातम्या-
“मागे अहमदाबादेत येऊन ट्रम्प यांनी कोरोना पसरवला, अन् आता…”
“बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा, अन् तुम्ही त्याच बापाची चेष्टा करताय”
“आम्ही कुणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक”
“शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध”
बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या!