बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएल दरम्यान मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट ‘महास्पोर्ट्स’ला जबरदस्त प्रतिसाद

पुणे | महा स्पोर्ट्स या प्रादेशिक भाषेतील देशातील पहिल्या खेळाबद्दलच्या बातम्या देणाऱ्या वेबसाईटला वाचकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून 2016साली सुरू झालेल्या या वेबसाईटने 2021 पर्यंत यशाचा मोठा टप्पा पार केला आहे. 2021 मध्ये होत असलेल्या आयपीएलचं वार्तांकन अतिशय अचूक व मुद्देसूद पद्धतीने आपल्या www.mahasports.in या वेबसाईटवर लेख, बातम्यांद्वारे करून वाचकांची मनं जिंकली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात युनिक युजर्स आणि पेज व्ह्यूजदेखील मिळवले आहेत.

भारतात आयपीएलचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर कोरोना संकटामुळे दुसरा टप्पा हा सध्या यूएईमध्ये सुरू आहे. त्यातच महा स्पोर्ट्स या वेबसाईटने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान तब्बल 1147 लेख तसेच 1200हून अधिक ग्राफिक्स आणि व्हिडीओची निर्मिती केली. महा स्पोर्ट्स या पहिल्यावहिल्या प्रादेशिक स्पोर्ट्स वेबसाईटची सुरुवात शरद बोदगे आणि चिन्मय रेमणे या तरुणांनी 2016साली केली. अवघ्या पाच वर्षात महा स्पोर्ट्सकडे मराठीत स्पोर्ट्समध्ये अतिशय उत्तम कंटेंट निर्माण करणारी अग्रगण्य वेबसाईट म्हणून पाहिलं जात आहे.

महा स्पोर्टसला महिन्याला जवळपास 3 कोटींहून अधिक पेजव्ह्यूज मिळत असून आयपीएल-2021च्या काळामध्ये महा स्पोर्ट्सने 24 लाख युनिक युजर्स आणि 1 कोटी 26 पेजव्ह्यूज मिळवले आहेत. अतिशय कमी वेळात महा स्पोर्ट्स ही वाचकांच्या पसंतीस उतरली असून आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना अजूनही बाकी असून वाचक महा स्पोर्ट्सला यापुढेही नक्कीच पसंती देतील, यात काहीच दुमत नाही.

या वेबसाईटची स्थापना करणारे शरद आणि चिन्मय यांनी बोलताना असं म्हटलं की, “स्पोर्ट्सबद्दल जर आपल्या मातृभाषेत वाचायला मिळालं तर ते सर्वांनाच आवडतं तसेच याचाच मोठा फायदा महा स्पोर्ट्सला होत आहे. त्याचबरोबर आयपीएल दरम्यान दरवर्षी वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो पण यावर्षीचे आकडे अत्यंत सुखावणारे आहेत, यामुळे वाचकांना नेमकं काय पाहीजे, हे शोधण्यासाठी आम्हाला नक्की मदत होईल”

थोडक्यात बातम्या

विमानाचं इंधन होणार स्वस्त; ‘या’ राज्याकडून करामध्ये मोठी कपात

देशातील कोरोना रूग्णांसह मृतांच्या संख्येतही वाढ, पाहा ताजी आकडेवारी

“महाराजांच्या घोड्यावर बसून गाढवपणा, या कृत्यानंतर मग बाबरसेना काय करणार?”

कब्बडी खेळताना, नाचताना दिसल्या प्रज्ञा सिंह ठाकूर; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल, पाहा व्हिडीओ

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! खाद्य तेलाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More