अखेर 9 दिवसांनी सापडला पिंपरीचा डुग्गू, वाचा नेमकं काय घडलं…
पुणे | पुण्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील बालेवाडी (Balewadi) हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून अपहरण झालेला डुग्गू अखरे सापडला आहे. त्यामुळे सध्या पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
नऊ दिवसांपूर्वी पुण्यातून एका चार वर्षीय मुलाचं अपहरण झालं होतं. अपरहरण झालेल्या मुलाचं नाव स्वर्णव चव्हाण असं आहे. अखेर आज दुपारी पुनावळे येथे सापडला आहे. अपहणानंतर नऊ दिवसांनी स्वर्णव उर्फ डुग्गू सापडला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्वर्णव 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या आपल्या एका लहानग्या मित्रासोबत शाळेत जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणानं त्याचं अपहरण केलं आहे. मात्र अपहरणानंतर खंडणीसाठी कोणातही फोन न आल्यानं त्याच्या घरच्यांसह पोलिसांचंही टेंशन वाढलं.
दरम्यान, स्वर्णवचं अपहरण कोणी केलं होतं याचा अदयाप काही सुगावा लागला नाही. त्यामुळे याविषयी पोलीस अजूनही तपास करत आहेत.
बालेवाडी हाय स्ट्रीटवरून अपहरण झालेला लहान मुलगा सापडला आहे. त्यांची तब्येत चांगली आहे.
The little boy kidnapped from Balewadi High Street has been found. He is in good health. #Pune
— PUNE POLICE (@PuneCityPolice) January 19, 2022
थोडक्यात बातम्या –
रागाच्या भरात महिलेनं ऑनलाईन विकला पती, ‘या’ सवयीमुळे होती त्रस्त
वरुण धवनवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचं झालं निधन
कोरोनाचा शेवट कधी होणार?; WHO च्या वक्तव्यानं टेंशन वाढलं
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लावावं का?; WHOचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.