बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश; लश्कर ए तोयबचे तीन अतिरेकी ठार

श्रीनगर | सुरक्षा दलाला लश्कर ए तोयबच्या तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. या चकमकीत लश्करचा पाकिस्तानातील कमांडर एजाज ऊर्फ अबु हुरैराचाही खात्मा करण्यात आला आहे.

काश्मीर पोलिसांना काही अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या टीमने संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनीही बचावासाठी गोळीबार केला. या चकमकीत अतिरेकी ठार झाले.

सुरक्षा दल आणि केंद्रीय राखवी दलाच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घेराबंदी केली. घटनास्थळी बॉम्ब निरोधक पथकालाही पाचारण करण्यात आलं. त्यानंतर आयईडी निष्क्रिय करून तिथेच नष्ट करण्यात आलं.

या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणवार शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा दलाने हे आयईडी निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

नवाजुद्दिन सिद्दीकीचा फोटो शेअर करत कंगना म्हणाली ‘मला वाघ मिळालाय’

“मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत”

“एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न”

“भारतातल्या नागरिकांना विनामास्क फिरताना बघायचंय”

“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More