बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे पुन्हा जगाचं टेन्शन वाढलं, ही धक्कादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली | कोरोनाच्या(corona) आलेल्या दोन्ही लाटेत कोरोनानं जगभरात लाखो लोकांचे बळी घेतले. त्यामुळे सगळीकडे मृत्यूचा तांडवच पहायला मिळाला. कोरोना आटोक्यात येत असतानाच आता पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

सध्या हिवाळा सुरु झाला असून आता युरोपमध्येही थंडीची लाट येणार आहे. याच पार्श्वभूमूीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगतिलं की, युरोपमध्ये आता कडाक्याची थंडी पडणार असून त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कोपरहेगनमध्ये असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयानं कोरोनाबाबत हा मोठा संदेश दिला आहे.

थंडीची लाट संपेपर्यंत युरोपात 7 लाख जणांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युरोपातील 53 देशांना मिळून हा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचं टेंशन आणखी वाढलं असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More