बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलाम कोल्हापूरांना! कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी केला हा खास उपक्रम

कोल्हापूर | देश सध्या कोरोनाशी मोठी लढाई लढतोय. राज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची प्रचंड कमतरता जाणवत आहे. अशा संकट काळात अनेकजण प्रेरणादायी कामगिरी बजावताना दिसत आहेत. अशातच कोल्हापूरकरांनी कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी फलक लावलेले पाहायला मिळाले.

कोरोनाच्या संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या मनोवृत्तीला सलाम करण्यासाठी कोल्हापुरात ‘सलाम कोल्हापूरकर’ हा उपक्रम राबविला जात आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारानं चौकाचौकात झळकलेल्या या फलकामुळे या कोरोनायोद्धांना लढायला आणखी बळ नक्कीच मिळणार आहे.

कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत. नावासाठी नाही तर सेवेसाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. विविध व्यक्ती, संघटनांचे हे काम इतरांना आदर्शवत आहे. त्यामुळे एकमेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या या मनोवृत्तीला सलाम करण्यासाठी ‘सलाम कोल्हापूरकर’ हा उपक्रम राबविला जात आहे.

दरम्यान, कोरोनाच्या या संकटात अनेकजण पडद्यामागे राहता मदतीचा हात पुढे करत आहेत. काहींजण स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांची सेवा करत आहेत. अशांचे कौतुक करण्यासाठी कृतज्ञतेचे चार शब्द नक्कीच बळ देणारे आहेत. म्हणूनच हा उपक्रम राबविला जात आहे, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा म्हणत परिचारिकांचं आंदोलन!

“सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं”

“केंद्रातील मोदी सरकार घालवल्याशिवाय देशातील शेतकऱ्यांसह, कष्टकऱ्यांचे अच्छे दिन येणार नाही”

कंगना रणौतनं केली देशाचं नाव बदलण्याची मागणी, म्हणाली….

“2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More