बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कडक सॅल्यूट! एकही सुट्टी न घेता 8 महिन्यात केलं तब्बल 61 हजार जणांचं लसीकरण

भोपाळ | कोरोना महामारीनं सगळ्यांच्या जीवनात काही ना काही बदल घडवले. अनेकांना खूप गंभीर त्रासाला सामोरं जावं लागलं. कोरोना काळात अनेक कोरोना वाॅरियर्सनं आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र एक करत आपलं कार्य चोखपणे बजावलं. अशातच सध्या एका आरोग्य कर्मचाऱ्यानं कौतुकास्पद कामगिरी बजावल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे सध्या लसीकरण मोहिम राबवल्या जात आहे. यातच भोपाळमधील एका महिला कर्मचाऱ्यानं कोरोना काळात एकही दिवस सुट्टी न घेता तब्बल 61 हजार जणांचं लसीकरण केलं आहे.

रात्रंदिवस झटणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांचं नाव गायत्री श्रीवास्तव असं आहे. तिनं केलेल्या या कामाला मध्य प्रदेशचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी गायत्री यांचं कौतूक केलं आहे. याशिवाय देशभरातूनही तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, देश सध्या कोरोनाशी मोठी लढाई लढतोय. राज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची प्रचंड कमतरता जाणवत आहे. अशा संकट काळात अनेकजण प्रेरणादायी कामगिरी बजावताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मद्यप्रेमींचा हिरमुड! ‘या’ ठिकाणी तब्बल 45 दिवस दारूची दुकानं बंद राहणार

शिवलीला पाटील बिग बॅासमधून बाहेर, समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

“आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, संपूर्ण माहिती मिळताच तातडीने मदत करणार”

“उगाच मला डिवचू नका, मी केंद्रातलं सरकार पाडलंय”

आंदोलन भोवलं! काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More