बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गांगुली स्वार्थी होता, त्याला…’; ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

नवी दिल्ली | भारताचे क्रिकेट इतिहासातील अतिशय वादग्रस्त प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅपेल यांची ओळख आहे. त्यांचा कार्यकाळ अतिशय वादाग्रस्त ठरला होता. त्याच्याच काळात सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपेल वाद रंगला होता. गांगुलीला भारतीय संघातील कर्णधार पदावरून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. या वादामुळेच भारतीय संघ 2007 च्या वर्ल्डकप मधून बाहेर पडला होता.

सौरव गांगुली मेहनती नव्हता, तर तो खूप मतलबी होता. त्याला खेळाविषयी काही देणं घेणं नव्हतं. तो फक्त कर्णधार पदाविषयी स्वार्थी होता, असा गंभीर आरोप ग्रेग चॅपेल यांनी केला आहे. त्याच्या खेळात सुधारणा करण्यावरही त्याचं लक्ष नसायचं. त्याच्या नेतृत्वामध्येही अनेक चुका होत्या. तो खेळात कधी मेहनती नव्हता. त्याच्या खेळात सुधारणा व्हाव्यात, असं त्याला कधीच वाटायचं नाही. केवळ मी कर्णधार असावा, एवढंच त्याला वाटायचं, असं चॅपल यांनी म्हटलं आहे.

राहुल द्रविड खूप चांगला कर्णधार होता. त्याला भारताचा संघ जगातील टॉप संघ व्हावा, टीममध्ये बदल करावेत असं वाटायचं. द्रविडला नेहमी वाटायचं भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांमध्ये असावा. त्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असायचा. द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्षभर चांगली कामगिरी केली होती, असंही चॅपल म्हणाले.

सौरव गांगुलीला संघाबाहेर जावं लागलं तर आपलं काय खरं नाही, असा मेसेज संघातील सिनिअर खेळाडूंपर्यंत गेला. त्यामुळे त्यांनी मला विरोध करायला सुरुवात केली, असा धक्कादायक आरोप देखील त्यांनी केला आहे. तर याआधीही गांगुलीला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची बोलणी करण्यासाठी चॅपल घरी आले होते, असं सचिन तेंडूलकरने मागे सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या–

कोरोनानंतर ‘हा’ गंभीर आजार झाल्याची जगातील पहिलीच घटना, डाॅक्टर आणि वैज्ञानिकही अचंबित

ATS प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला 1 लाख रूपये देणार; मध्य प्रदेश सरकारची घोषणा

‘कोरोना व्हायरसमुळे तुम्हाला मधुमेहाचा आजार होऊ शकतो’; ICMRच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More