भारताच्या ‘शांतीदुता’चं श्रीहरीकोटातून यशस्वी प्रक्षेपण

Photo- ANI

श्रीहरीकोटा | दक्षिण आशियाई देशांच्या GSAT-9 उपग्रहाचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. हा उपग्रह भारतातर्फे सार्क देशांना भेट देण्यात आलाय. पाकिस्तानने मात्र स्वतःचं अंतरिक्ष धोरण असल्याचं सांगून या उपग्रहाचा लाभ घेण्यास नकार दिला.

सार्क देशांची दूरसंचार यंत्रणा या उपग्रहामुळे सक्षम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर दक्षिण आशियातील देशांशी मैत्री वाढवण्याच्या दृष्टीने ४५० कोटींच्या या उपग्रहाची योजना मांडली होती.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या