PTI BABY - ...आणि आईनं आपल्या बाळाचं नाव चक्क 'जीएसटी' ठेवलं!
- देश

…आणि आईनं आपल्या बाळाचं नाव चक्क ‘जीएसटी’ ठेवलं!

जयपूर | देशभरात जीएसटीबाबत संभ्रमाचं वातावरण आहे, मात्र राजस्थानमधल्या बिवा गावातील महिलेनं कोणताही संभ्रम न ठेवता आपल्या नवजात मुलाचं नाव चक्क जीएसटी ठेवलं आहे.

३० जूनच्या मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांनी या बाळाचा जन्म झाला. त्याचवेळी देशभरात जीएसटी लागू झाला त्यामुळे या बाळाचं नाव जीएसटी ठेवण्यात आलं.

सध्या देशभरात हे बाळ कौतुकाचा विषय ठरतंय. भाजपचे प्रवक्ते नलीन कोहली आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या बाळाला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा