नवी दिल्ली | जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे, देशातील प्रामाणिक लोकांमध्ये जीएसटीबद्दल उत्साहपुर्ण वातावरण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलत होते.
जगभरात योग दिवस उत्साहात साजरा झाला, योगदिनी दिव्यांग व्यक्तींनी विश्वविक्रम रचला, हे भावूक करणारे दृश्य होते, असं त्यांनी सांगितलं.
तसंच यावेळी त्यांनी जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण करून देत मुखर्जी यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते, असंही यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!
-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!
-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा