बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालकमंत्री छगन भुजबळांना डच्चू?; संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

नाशिक | स्थानिक स्वराज्य संस्थेतील देण्यात येणाऱ्या अतिरिक्त ओबीसी आरक्षणाविषयी सध्या भाजप तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचा खुलासा केला होता. त्यात त्यांनी ओबीसी आरक्षणावर मदत मागितल्याचं देखील सांगितलं आहे. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनंंतर आता शिवसेना खासदार संजय राऊतांच्या एका वक्तव्यानं राजकारणात खळबळ उडाली आहे.

नाशिकात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यशैलीमुळे जिल्ह्यातील शिवसेना आमदारांना निधी मिळण्यात अडचण होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याकडे याबद्दल तक्रारी केल्या होत्या. शिवसेनेकडे सत्ता नसतानाही आपण अनेकांना आपल्या स्टाइलने उत्तरे दिली आहेत. त्याप्रमाणेच पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीला शिवसेना स्टाइलमध्ये उत्तर द्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून आणले तर आपलाच पालकमंत्री बसवता येईल, अशी व्यवस्था करा यासाठी कामाला लागण्याचे आदेश राऊत यांनी दिले आहेत. राज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. महाविकास आघाडीची स्थापना करतानाच हे ठरलं असल्याचं राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केेलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेनेचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यात त्यांनी शिवसेना विश्वासू पक्ष असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता संजय राऊतांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“काय भाषा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा”

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पहिल्या टप्यात ‘या’ किल्ल्यांचा समावेश

“राजकारणात पैसाच बोलतोय मात्र शिवसेना लोकांच्या श्रीमंतीवर चालणारा पक्ष”

‘या’ जिल्ह्यातील तळीरामांसाठी खुशखबर; मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार

“…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More