बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gudi Padwa 2022 : 2 वर्षानंतर साजरा होणार निर्बंधमुक्त गुढीपाडवा

मुंबई | गेल्या दोन वर्षापासून कोरोना (Corona) महामारीमुळे हाहाकार माजवला आहे. या महासाथीच्या रोगानं सगळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र आता कोरोना आटोक्यात येत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोरोना आटोक्यात आल्यामुळे राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.

कोरोनामुळे सगळे सण-उत्सव घरच्या घरी साजरे होत होते. मात्र यंदाचा गुढीपाडवा (Gudi Padwa) निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पहायला मिळतोय. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यात आला नाही. मात्र यंदाचा पाडवा निर्बंधमुक्त असणार आहे.

ढोल-ताशांच्या गजरावर थिरकणारी तरुणाई, घोड्यांवर बसलेले लहानगे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, बुलेट अथवा मोटारबाईकवर भगवे फेटे, रेबॅनचे गॉगल, नाकात नथ घालून व नऊवारी परिधान केलेली स्त्रीशक्ती, पारंपरिक वेशातील तरुणाई व पुरुष मंडळी पुन्हा पहायला मिळणार आहे.

दरम्यान, तब्ब्ल दोन वर्षानंतर निर्बमधमुक्त नववर्ष पहायला मिळणार असल्यानं नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

“राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी….”

“गृहखाते शिवसेनेकडे दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील”

अभिनेत्री विशाखा सुभेदारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली…

“मुख्यमंत्री नाराज नाहीत, गृहखात्यामध्ये काही कमतरता असेल तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More