बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांविषयी शनिवारी मार्गदर्शन सत्र, वाचा सविस्तर

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या विभागातील अभ्यासक्रम व त्यांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी विभागाकडून मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या शनिवारी (2 जुलै) संध्याकाळी 4 वाजता संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीने मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

एफसी रोडवरील रानडे इन्स्टिट्यूट आवारामधील सभागृहात हे मार्गदर्शन सत्र होणार आहे. तसेच या विभागामधील अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमामधील बदलांविषयी या सत्रामध्ये माहिती देण्यात येणार आहे.

दरम्यान, इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी केले आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वात मोठी बातमी! औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर

‘…तोपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ नये’, शिवसेनेचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

बहुमत चाचणीचा फैसला आज होणार, राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना न्यायालयात

एकनाथ शिंदे व बंडखोर आमदार आज गोव्यात दाखल होणार, राजकीय हालचालींना वेग

सुरक्षेशिवाय अजित पवार दोन तास गायब, मंत्रिमंडळात खळबळ…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More