बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील”

मुंबई |  महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळू-हळू ओसरत आहे. त्यामुळे राज्य ससरकार कडक केलेले निर्बंध शिथिल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  परंतू कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे देशात सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे यावर्षीही बकरी ईदसाठी मागिल वर्षाप्रमाणेच धोरण असणार असल्याचं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. आज अजित पवार यांनी पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला भेट दिली. त्याठिकाणी नव्यानं उभारण्यात आलेल्या सुविधा व साधनसामग्रीचा आढावा घेतला. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकारने बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सरकारकडून नागरिकांना सण उत्सव साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

त्याचप्रमाणे, आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जायला सज्ज असलो, तरी पुण्यात निर्बंध कायम राहणार असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मागिल वर्षीच्या मार्गदर्शक सूचना-

  • कोरोनामुळे सार्वजिनक कार्यक्रमांना बंदी आहे. हे लक्षात घेऊन बकरी ईदचा नमाज, मस्जिद, ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
  • जनावरांचे बाजार सध्या बंद असल्यामुळे, नागरिकांनी बकऱ्याची खरेदी ऑनलाईक करावी.परंतू नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
  • बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमवून गर्दी करू नये.

थोडक्यात बातम्या-

‘पुण्याची मस्तानी जगात भारी, तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

ते तर केवळ… पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबात धक्कादायक गौप्यस्फोट

ईपीएफओची मोठी कारवाई! पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील

‘मला तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’; करीनाने सांगितला आईपणातला अनुभव

‘गोंधळ आघाडीतला नवा तमाशा’; अतुल भातखळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More