शिवजयंती उत्सवाबाबत उद्धव ठाकरेंचे महत्वाचे निर्देश, पाहा काय आहे नियमावली?
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचे तमाम मावळे व शिवभक्तांसाठी शिवजयंती कोणत्या सणापेक्षा कमी नाही. शिवरायांच्या जयतींचा उत्साह राज्यभर पाहायला मिळत आहे. महाराजांनी संघर्षातून निर्माण केलेल्या स्वराज्याचा अभिमान रयतेच्या मनात आजही कायम आहे.
शिवरायांच्या जयंतीनिमित्त आज शिवभक्तांमध्ये कमालीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडी व जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासनाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.
शिवरायांच्या जयंती उत्साहासाठी वेगवेगळ्या प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. या शिवज्योती दौडीत 200 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात 500 उपस्थितांना परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करा, स्वच्छतेची काळजी घेत शिवजन्मोत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊतांचा हेतू संशयास्पद, त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का?”
सुशांत सिंह प्रकरणावर नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
राणे-शिवसेना वाद टोकाला! नारायण राणेंचा ‘अधिष’ महापालिकेच्या रडारवर
चंद्रकांत पाटलांनी दिला उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले “रश्मी ठाकरेंना सामनाच्या…”
Comments are closed.