बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! गुजरातमधून 350 कोटींचं हेराॅइन जप्त

नवी दिल्ली | हल्ली ड्रग्ज (Drugs) प्रकरणात अटक आणि छापेमारीचं प्रमाण वाढलं आहे. यावर्षी एप्रिल महिन्यातही गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली होती. एटीएस आणि डीआरआयने कच्छमधील कांडला बंदरात कंटेनरमध्ये लपवून ठेवलेलं 1,300 कोटी रुपयांचं 260 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. यानंतरची आता एक मोठी कारवाई पुन्हा गुजरातमध्ये करण्यात आली.

70 किलो हेराॅईनची मोठी खेप जप्त करण्यात गुजरात एटीएसल (ATS) मोठं यश मिळालं आहे. याची किंमत एकून 350 कोटी रूपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. सुत्राकडून माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. हा कंटेनर दुबईच्या जेबेल अली पोर्टमधून भारतात आला होता, अशी माहिती समजते.

सोमवारी संध्याकाळी एक कंटेनर उशिरा कच्छमधील मुंद्रा सीएफएसमध्ये (CFS) पोहोचल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. यानंतर कारवाई करत हेराॅईन जप्त केलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इतका मोठा ड्रग्जचा साठा अफगाणिस्तातून दुबई आणि तेथून भारतात आणला गेला आहे. हा साठा कंटेनरच्या आत कपड्यांमध्ये लपवण्यात आला होता. आणखी ड्रग्जचा साठा असू शकतो त्यामुळे झाडाझडती सुरू आहे.

अंमली पदार्थाची तस्करी कंटेनरच्या माध्यमातून राजरोसपणे होत आहे. नार्को-दहशतवाद (Narco-terrorism) हा मोठा धोका निर्माण करत आहे. ड्रग्स तस्कर या बंदराचा वापर तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात करत आहे. असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गेल्यावर्षीही सप्टेंबरमध्ये देशातील सर्वात मोठी जप्ती झाली होती. डीआरआयने 3,000 किलो हेरॉईनची खेप जप्त केली होती.

थोडक्यात बातम्या

‘या’ कारणामुळे मुख्याध्यापकाचा पगारच कापला, कारण ऐकून नेटकरी संतापले

मुर्मू की सिन्हा? शिवसेना कोणाला पाठींबा देणार?, वाचा सविस्तर

‘…तर सलमान खानला जीवानिशी मारु’, लॉरेन्स बिश्र्नोईने आणखी एकदा दिली धमकी

‘उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरं कोणी असतं तर…’, अपक्ष आमदाराचं मोठं वक्तव्य

शिवसेनेची हकालपट्टी मोहीम सुरुच, आणखी एका बंडखोर आमदाराला दिला नारळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More