बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण!

अहमदाबाद | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. विजय रूपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर रूपाणी यांनी पत्रकार परिषेद घेऊन राजीनामा दिल्याची घोषणा केली.

गुजरातच्या विकासाची ही यात्रा येत्या नेतृत्त्वाकडून वाढायला हवी म्हणून मी राजीनामा दिला आहे. पार्टीकडून जी जबाबदारी मला सोपवण्यात येईल ती मी पार पाडेल. मला 5 वर्षासाठी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आहे, असं विजय रूपाणी यांनी म्हटलं आहे.

रूपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची 7 ऑगस्ट 2016 रोजी शपथ घेतली होती. त्याचबरोबर आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात रूपाणी यांनी कामगार, रोजगार, वाहतूक पाणीपुरवठा मंत्री सारखी महत्वाची पदे भुषवली होती. त्यानंतर ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. रूपाणी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जवळचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांनी हा राजीनामा नेमका कशासाठी दिला आहे. त्याचं कारण समजू शकलं नाही आहे.

दरम्यान, गुजरात राज्यात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. गुजरात मध्ये पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे या समाजाची नाराची दूर करण्यासाठी भाजप व्यूवहरचना आखत असल्याचं बोललं जात आहे. परंतू राजीनामा देत असल्याचं मुख्य कारण अद्यापही समजू शकलं नाही आहे

थोडक्यात बातम्या- 

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता- राजनाथ सिंह

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे तरुणावर तक्रार दाखल

दिल्लीतील पावसाने मोडले सर्व रेकॉर्ड; दिल्लीचं विमानतळ पाण्यात

खोकल्यानंतर मोबाईल अ‌ॅप सांगणार कोणता आजार झालाय; जाणून घ्या अधिक माहिती

‘या’ अभिनेत्रीने एकाच चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल 17 किसिंग सीन दिले!

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More