…अन्यथा भाजपला रामराम करु; उपमुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा

अहमदाबाद | गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मनासारखी खाती न मिळाल्यानं बंडाचं निशाण फडकावलं आहे. 

पाटीदार आंदोलनावेळी त्यांना मुख्यमंत्री करायचं जवळपास निश्चित झालं होतं. मात्र ऐनवेळी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा झाली. आताही नितीन पटेल यांना अर्थ, नगरविकास आणि पेट्रोलियम खाती हवी आहेत, ती न मिळाल्याने ते नाराज आहेत. 

दरम्यान, नितीन पटेल यांनी आपली नाराजी अमित शहांपर्यंत पोहोचवल्याचं कळतंय. अन्यथा भाजपला रामराम करु, असा इशारा त्यांनी दिल्याची माहिती आहे.