गुजरात विधानसभा निवडणुकीत खराब ईव्हीएममुळे मोठा गोंधळ

अहमदाबाद | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. मात्र ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे प्रकार समोर येत असल्यानं अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे. 

एक-दोन नव्हे तर 100 ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं कळतंय. त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून लोकांना रांगेत ताटळत रहावं लागल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, बिघाड झालेल्या ईव्हीएम निवडणूक आयोगानं बदलल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलं आहे.