Gujarat GST Commissioner | गुजरातचे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावचं खरेदी केलं आहे. ही जमीन बळकावण्यात आल्याचा दावा अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला. यावरुन प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तब्बल 620 एकर जमीन खरेदी
नंदुरबारचे रहिवासी आणि सध्या गुजरातच्या अहमदाबाद जीएसटीचे मुख्य आयुक्त (Gujarat GST Commissioner) असलेले चंद्रकांत वळवी यांनी त्यांचे कुटुंब आणि नातेवाईकांसह महाबळेश्वरजवळील कांदाटी खोऱ्यातील झाडाणी गावाची संपूर्ण जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे तेथील 620 एकर जमीन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.
सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी गंभीर आरेप केले आहेत.
Gujarat GST Commissioner | साताऱ्यातील अख्खं गाव बळकावल्याचा आरोप
संबंधित सनदी अधिकाऱ्याने हे संपूर्ण गावच खरेदी केले आहे. यामुळे, 1886 चा पर्यावरण संरक्षण कायदा, 1976 चा वन संवर्धन कायदा आणि 1972 चा वन्यजीव संरक्षण कायदा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे नियमित उल्लंघन केले जात आहे, असा आरोप सुशांत मोरे यांनी केला.
झाडाणी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या नजीकच वसले आहे. याठिकाणी घनदाट जंगल असल्याने येथे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे. झाडाणीतील एका पुनर्वसित शेतकऱ्याची भेट घेतली असता, त्याने तुमचं आता पुनर्वसन झालं आहे, तुमची मूळ गावातील जमिन ही शासन जमा होणार आहे. तरी ती शासन जमा होण्यापेक्षा आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, असे म्हणत संबंधित सनदी अधिकाऱ्याने 8 हजार रुपये एकराने जमीन बळकावल्याचं त्यांनी सांगितलं.
हा भाग दुर्गम असून या प्रकरमाची सर्व माहिती घेणे सुरू आहे. माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
महेंद्रसिंह धोनीने घेतला सर्वांत मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाला..
सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत आहे तरी किती? जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
सोन्याचा ग्राहकांना मोठा दिलासा; ‘इतक्या’ रुपयांनी भाव घसरले