Top News देश

‘राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी माहित आहे का?’; मुख्यमंत्र्यांची टीका

नवी दिल्ली | राजधानी दिल्ली येथे चालू असलेल्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली होती. शेतकऱ्यांच्या या बंदला काँग्रेसने पाठींबा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर निशाणा साधला.

मी राहुल गांधींना विचारू इच्छितो की, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी ठाऊक आहे का?, असा सवाल करत विजय रूपानी यांनी गाधींवर निशाणा साधला. मेहसाणा येथे नर्मदा पेयजल योजनेच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेस ज्या सुधारणांची वकीली करायचं आज त्यालाच काँग्रेसकडून विरोध करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रूपानी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात  एपीएमसी कायद्यामध्ये बदल करु आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ठरलेल्या बाजारपेठांच्या बाहेर शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देऊ, असं म्हटलं होतं. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाच बदल केला आहे त्यामुळे काँग्रेस का विरोध करत आहे, असं रूपानी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या

“…फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली”

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; रिया-सुशांत प्रकरणाशी संबधीत ड्रग पेडलरला अटक

फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक प्रभावी 100 महिलांच्या यादीत निर्मला सीतारामण यांचा समावेश

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर येणार वेबसिरीज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या