गांधीनगर | केरळच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गुजरातपुढे सरसावले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून हात पुढे येत आहेत. इतर राज्यांनीही मदतीचा हात दिला आहे. तर तेथील आमदार, मंं त्री स्वतः पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मागील 100 वर्षांतील हा पूर सर्वांत भयंकर मानला जात आहे. पुरामुळे जवळपास 2000 कोटींचं नुकसान झाले आहे.
दरम्यान, या पुरामुळे लाखोंच्या संख्येने लोक बेघर झाले आहेत. त्यात 300 हून अधिक लोकांचा मृत्यूही झाला आहे.
Gujarat Chief Minister Vijay Rupani announces Rs. 10 crores from Chief Minister Relief Fund for flood-hit Kerala. #KeralaFloods (File pic) pic.twitter.com/l2pFOKfQop
— ANI (@ANI) August 18, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-1997 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं; भाजप महापौरांनी तोडले अकलेचे तारे
-केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केरळमधील मंत्रीही रस्त्यावर!
केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!
-पिंपरीत पोस्टर लावणारा ‘शिवडी’चा ‘मजनू’ अखेर सापडला
-जियोचा 1 सेंकदात 100 MB स्पीड; कशी कराल नोंदणी?