Top News देश

मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींना केले नग्न!

गांधीनगर | मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी काॅलेजमधील 68 विद्यार्थिनींना अंतर्वस्त्त्रे काढायला लावल्याचा धक्यादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या भुज येथील एका महाविद्यालयात हा संतापजनक प्रकार घडला आहे. मासिक पाळीमुळे संस्थेच्या काही नियमांचे उल्लंघन होते, असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. अहमदाबाद मिररने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

भुजमध्ये एक संस्था चालवण्यात येते. प्रशासनाच्या नियमानुसार मासिक पाळी असणाऱ्या मुलींना महाविद्यालयाच्या धार्मिक स्थळी किंवा स्वयंपाकघरात प्रवेश करण्यास मनाई आहे. तसेच या काळात कोणालाही स्पर्शही करायचा नाही असा प्रशासनाचा दंडक आहे. या नियमांचा कोणी भंग तर करत नाही ना? हे तपासण्यासाठी प्रशानसाने मुलींची अंतर्वस्त्रे उतरवली.

कोणाची मासिक पाळी सुरु आहे का? असा सवाल मुलींना विचारण्यात आला होता. यावेळी 2 मुलींनी हात वर केला, त्यांना बाहेर काढण्यात आले. उरलेल्या 68 मुलींना स्वच्छतागृहात नेहून त्यांचे कपडे व अंतर्वस्त्रे काढून तपासणी करण्यात आली.

या प्रकरानंतर 68 मुलींनी आंदोलन केले आणि संस्थेच्या विश्वस्तांकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

मी पक्षाचा झेंडा बदललाय, भूमिका नाही; राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

महत्वाच्या बातम्या-

राजकारणातील खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार? अमित शहा म्हणाले…

औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार- चंद्रकांत खैरे

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या