स्मृती इराणींच्या खासदार निधीच्या वापरात गैरव्यवहार?; निधी परत करण्याचे कोर्टाचे आदेश

गांधीनगर | केंद्रीय मंत्री आणि गुजरात मधून राज्यसभेवर खासदार असलेल्या स्मृती इराणींच्या खासदार निधीतील कामात गैरव्यवहार झाल्या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. उच्च न्यायलयानं निधी परत करण्याचे आदेश ठेकेदारांनां दिले आहेत.

स्मृती इराणींच्या खासदार निधीची कामं निविदा न काढताचं दिली गेली, काही कामं कागदावरचं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आलं होतं.

आणंद जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार अमित चावडा यांनी 2017 मध्ये स्मृती इराणींच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती त्यांनंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

पेंग्विनसचा लाड करत बसण्यापेक्षा मुंबईकरांच्या जीवाची काळजी घ्या- नितेश राणे

भारताने चीनचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घ्यावा; स्वदेशी जागरण मंचची मागणी

…तर नेत्यांनी निवडणुका लढवू नये; उच्च न्यायालयाचे ताशेरे

चीन मसूद अजहरला संत म्हणून मान्यता देणार आहे का?; सामनातून शिवसेनेचा सवाल

बेशरम भाजप प्रवक्तीनं मुंबईकरांची माफी मागावी- जितेंद्र आव्हाड