गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे गुजरात ठरले पहिले राज्य

गांधीनगर | आर्थिक दृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला शनिवारी राष्ट्रपतींनी मान्यता दिली. आता या कायद्याची अंमलबजावणी करणारे गुजरात पहिले राज्य ठरणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी याबाबतची घोषणा केली. 14 जानेवरीपासून 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लागू करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे.

या आरक्षणाचा लाभ आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या सवर्णांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत मिळणार आहे.

दरम्यान, आरक्षणाचे विधेयक लोकसभेमध्ये 8 जानेवारी तर राज्यसभेत 9 जानेवारीला मंजूर  झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

-अंबाती रायडूच्या बॉलिंग अ‌ॅ‌‌‌‌‌‌‌‌‌‌क्शनवर पंचांनी उपस्थित केले प्रश्न ‌

-राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेनं निवडणुकीसाठीच घेतला- उद्धव ठाकरे

-एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

-“मोदींची भाषणं ऐकून मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो”

-आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत- धनंजय मुंडे