Top News

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी संतापले; “जबरदस्ती भारत बंद केला तर…”

गांधीनगर | शेतकऱ्यांनी उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरात बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

गुजरातमध्ये बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा विजय रुपाणी यांनी दिला आहे. ते अहमदाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या नावावर विरोधक भारत बंद आंदोलन करत आहेत. नाव केवळ शेतकऱ्यांचं आहे. पण विरोधकांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, अशी टीका विजय रुपाणी यांनी केली आहे.

जे लोक गुजरातमध्ये जबरदस्ती बंद पुकारण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठीही सरकार विशेष प्रयत्न करणार आहे, असं विजय रुपाणी यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही येणार म्हणणारे फडणवीस सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत”

कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच मोठं वक्तव्य, म्हणाले…

…तर जेलमध्ये राहणं पसंत करेन- ममता बॅनर्जीं

“राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले”

केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या