मुंबई | शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून जो तो जुना नवा नेता आमदार उठतो आणि पक्षाच्या नेत्यांवर आरोप करतो आहे. शिवसेना मागील काही दिवसांपासून धर्मसंकटातून जाते आहे. वेगवेगळे आजी माजी नेते उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहे. आता अशाच प्रकारचा आरोप शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे.
नेत्याने कार्यकर्त्यांचे ऐकले पाहिजे, पण आमचे म्हणणे कोणी ऐकले नाही. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thacekeray) आम्हाला वेळ दिला नाही. संजय राऊतांनी हलकटासारखे इथून निघून जा, असे सांगितले. तेव्हा ठरविले, मंत्रीपद गेले खड्यात, आम्ही बंड करून उठलो, असे गुलाबराव पाटील म्हणाले. माझा हा वैयक्तित प्रश्न नव्हता, पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती. म्हणून आम्ही बंड केले असा खुलासा देखील पाटलांनी केला.
पाटलांनी यापूर्वीही ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, 40 आमदारांनी सोडले, मंत्रीपद सोडले. पण ते काही केल्या शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, असे त्यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले होते. संजय राऊतांनी त्यांचा पूर्वाश्रमीचा इतिहास सांगितला होता. त्यामुळे देखील ते दुखावले गेले होते.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिले होते. गुलाबराव पाटील म्हणाले, आमच्या यशात शिवसेनेचा 80% वाटा असला तरी 20% मेहनत आमची आहे. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवले. आम्ही संघटना वाढवली. जळगावात 47 डिग्री तापमानात आम्ही 35 लग्ने लावलीत. राऊतांनी जळगावात येऊन तेवढी लग्न लावावीत, आम्ही त्यांनी बहाद्दर म्हणू.
थोडक्यात बातम्या –
‘त्या’ फोटोंमुळे सुष्मिता सेन सोशल मीडियावर ट्रोल!
“शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती देणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश”
नितेश राणेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले…
मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
Comments are closed.