संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून ‘गुलाबजाम’चा खमंग!

मुंबई | ‘वजनदार’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा नवीन चित्रपट गुलाबजाम आ़ज प्रदर्शित झाला. सिनीयर सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका साकारली आहे. 

या चित्रपटाचे वैशिष्ठ्य म्हणजे पुन्हा एकदा एक मानवी भावभावना दाखवणारी कथा आहेत.  नेहमीच्या सिनेमांमधील ब-याच गोष्टी यात नाहीत. कथा फार वेडीवाकडी वळणं घेत नाही. सरळ, साधी आणि सोपी ही कथा आहे, असं सोनाली कुलकर्णीनं म्हटलंय. 

दरम्यान, या चित्रपटात लव्हस्टोरी नसल्यानं अर्थातच वेगळी गाणी ऐकायला मिळणार आहेत. या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते यांनी स्वरबद्ध केलेली आहेत.