Gulabrao deokar | महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानासाठी आता अवघे 8 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी नेत्यांच्या प्रचारसभा गाजत आहेत. शरद पवार गटाचे जळगाव ग्रामीणचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पक्षप्रमुख शरद पवार यांची काल जळगावच्या धरणगावात सभा पार पडली. या सभेत गुलाबराव देवकर (Gulabrao deokar ) यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी गुलाबराव यांना कडक शब्दात इशारा देखील दिलाय.
“यापुढे कार्यकर्त्याला हात लावला तर त्याचा हात काढल्याशिवाय राहणार नाही. गांडूची अवलाद नाही. या ठिकाणी काय मोगलाई सुरू आहे का?”, अशा शब्दांत गुलाबराव देवकर यांनी इशारा दिला. “आमचे बॅनर फाडले तर आमचे कार्यकर्ते म्हटले त्यांचे पण बॅनर फाडतो. पण, मी म्हटलं की आपली ती संस्कृती नाही”, असंही गुलाबराव देवकर म्हणाले.
गुलाबराव देवकर यांची सडकून टीका
“गुलाबराव यांनी मला दहा वर्ष घरात बसवलं होतं. माझं घरकुल काढलं. त्या घरकुल घोटाळ्यात माझा काही संबंध नव्हता. त्यामुळे 2014 ची निवडणूक मी जेलमधून लढलो. त्यावेळी तुम्ही कमी पडले. आपला पराभव झाला. उद्याची निवडणूक आपली आहे. 23 तारखेचा गुलाल आपला आहे.”, असा विश्वासही गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केला.
यावेळी गुलाबराव देवकर यांनी 2009 मधील मंत्रीपदाचा एक किस्सा देखील सांगितला. “मंत्रीपद देईन, साहेबांनी बोलावून सांगितलं होतं. मात्र घरातही आणि बाहेरही कुणाला सांगायचं नाही असं म्हटलं होतं. गुलाबराव पाटलांनी दहा वर्षात ठोस काम केलं असेल तर सांगा. मी 1 लाख रुपये बक्षीस देईन सांगितलं होतं. पण अजूनही उत्तर आलेलं नाही आणि उत्तर येणार सुद्धा नाही”, असं गुलाबराव देवकर (Gulabrao deokar ) म्हणाले.
“माझ्याकडे पाणीपुरवठा खातं असतं तर..”
“गुलाबराव यांनी मतदारसंघाचा विकास सोडून त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास केला. म्हणे, पाणीवाला बाबा आहे. यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे. या मतदारसंघातल्या मोठ्या गावांमध्ये 25-25 दिवस पाणी येत नाही. पाणी योजनांच्या दोन वर्षापासून वर्क ऑर्डर दिल्या. मात्र एकही योजनेच्या नळातून अद्यापपर्यंत पाणी आलं नाही. माझ्याकडे पाणीपुरवठा खातं असतं तर मी धरणगावला दररोज पाणी दिलं असतं.”, असंही गुलाबराव देवकर (Gulabrao deokar )म्हणाले.
News Title : Gulabrao deokar slams gulabrao patil
महत्वाच्या बातम्या –
आज कार्तिकी एकादशी, विष्णु देव ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण करणार!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा वयाच्या 12 व्या वर्षापासून ड्रग्सच्या विळख्यात!
महायुती सरकारने गोरगरिबांचं उत्पन्न वाढवण्याचं काम केलं- संभाजी पाटील निलंगेकर
अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर…? शरद पवारांच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
राज्यात नवीन अभियान सुरु; “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू”