बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर बोचरी टीका, म्हणाले ‘ काहींना आजही…’

जळगाव | महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एकमेकांवर उघड उघड टीका केल्याने दोघांमधील वाद चर्चेचा विषय ठरत आहे.

गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथील कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसेंचा नामोल्लेख टाळत जोरदार निशाणा साधला आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही गद्दारांना जागा नव्हती, कडेलोट करायचे, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला आहे.

काही लोक माझ्याविषयी नशिराबादमध्ये बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. कडाला कड लावून बोलावं, चारीमुंड्या चीत करूनच हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही, असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर काहींना आजही मुंख्यमंत्रीपदाची आस आहे म्हणत गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“किरीट सोमय्या कोण मला माहिती नाही, असे चु… देशात भरपूर आहेत”

मोठी बातमी! पुण्यात भाजप राष्ट्रवादीला शिवसेनेचा धक्का

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे मी आज जिवंत आहे”

“मी पहाटे 5 वाजता उठूनही काम करायला तयार पण…”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More